जळगाव मिरर । १ फेब्रुवारी २०२३।
राज्यातील पुणे शहरातून एका संतापजनक बातमी समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीस सात जणांनी तिला पळवून नेत एका खोलीत डांबून ठेवत निर्वस्त्र करुन तिला मारहाण करून आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ते साेशल मिडियावर प्रसारित केला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
काय घडली घटना ?
एका तरुणाने आपल्या मुलीस पळवून नेल्याचे रागातून नातेवाईकांनी संबंधित तरुणाच्या 24 वर्षीय बहिणीस बळजबरीने गाडीत घालून पळवून नेत तिला एका खाेलीत डांबून ठेवले. त्यानंतर तिला हाताने, सळईने मारहाण करत तिला दाेन दिवस काेंडून ठेवून निर्वस्त्र करुन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ते साेशल मिडियावर प्रसारित केला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी लाेणीकाळभाेर पोलिसांनी सात आराेपींवर गुन्हा दाखल केल्याची माहिती बुधवारी दिली आहे. नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे, बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गाेसावी (सर्व रा.उरळीकांचन,पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. याबाबत पिडित तरुणीच्या 30 वर्षीय बहिणीने आराेपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना 26 ते 29 जानेवारीच्या दरम्यान उरळीकांचन परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व आराेपी हे एकमेकांचे नातेवाईक आहे. नंदकुमार माटे यांचे मुलीस तक्रारदार यांचे भावाने पळवून नेल्याचे संशयावरुन आराेपींनी संगनमत करुन तक्रारदार आणि त्यांचे 24 वर्षीय बहिणीस जबरदस्तीने 26 जानेवारी राेजी संध्याकाळी रिक्षात बसवून पळून नेले. त्यानंतर आराेपींनी त्यांना घरी घेऊन जाऊन त्यांचे मुलीचा ठावठिकाणा विचारला असता, दाेघींनी भावचा ठावठिकाणा न सांगितल्यामुळे चिडुन आराेपींनी त्यांना हाताने, सळईने मारहाण केले. एका खाेलीत दाेन दिवस त्यांना काेंडन ठेवुन निर्वस्त्र करुन त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ करुन ते साेशल मिडियावर प्रसारित करुन त्यांची बदनामी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आराेपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे. एका तरुणाने 22 वर्षीय तरुणीस वेळाेवेळी जबरदस्तीने लग्न करण्याचा आग्रह करुन तसेच जबरदस्तीने शरीर संबंध करुन 11/10/2021 राेजी जबरदस्तीने तिच्याशी रजिस्टर पध्दतीने विवाह केला. त्यानंतर तरुणी साेबतचे शरीर संबंधाचे व्हिडिओ साेशल मिडियावर पाठविण्याची धमकी देवून तिच्याकडून दहा लाख रुपये मागुन घेतले. तसेच तिला त्याचे घरी रहाण्यासाठी ये म्हणून जबरदस्ती करुन तिचे कुटुंबियांना शिवीगाळ करुन तिच्याकडून दहा लाख रुपये घेवून तिचा वेळाेवेळी पाठलाग करुन तिची फसवणुक करण्यात आली आहे. सदरचा प्रकार डिसेंबर 2020 ते आतापर्यंत घडलेला आहे. याबाबत समर्थ पोलिस पुढील तपास करत आहे.