जळगाव मिरर । २७ जानेवारी २०२३ ।
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. याप्रकरणी नेहमी पोलीस स्थानकात घडलेल्या घटना कथन करताना तरुणी आपली आप बीती सांगत आहे. नुकतेच चाळीसगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मेहरूणबारे पोलीस स्थानकात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मेहूणबारे येथील एका परिसरात २१ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. त्या तरुणीचे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील निधोरा येथील एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याने तो युवक दिनांक 13 जानेवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्या तरुणीच्या घराजवळ येत तिला तिचे फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत तिला चाकूचा धाक दाखवीत चारची चाकीच्या गाडीत तिला बसवून औरंगाबाद येथील त्याच्या घरी नेत या ठिकाणी तिच्यावर दोन दिवस बळजबरी अत्याचार करीत तिला दि १५ रोजी बस स्थानकवर सोडून देत त्या ठिकाणाहून निघून गेल्या त्यानंतर तरुणीने मेहूणबारे पोलीस स्थानक गाठत त्याच्यासह त्याच्या दोन मित्रांनी विरोधात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके हे करीत आहे.