जळगाव मिरर । १३ मे २०२३ ।
ठाकरे व शिंदे गटाचे भांडण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावरून चित्र समोर आले असले तरी आता राज्याचे लक्ष विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे आहे ते कोणत्या गटाच्या आमदारांना अपात्र करतील याकडे लागून आहे. पण त्याचपूर्वी शिंदे गटाचे नेते यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले कि, आता ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार असल्याचा दावा केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
संजय शिरसाट म्हणाले, सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, पक्ष कोणाचा आहे की, पक्ष कोणाचा किंवा चिन्ह कोणाचं यावर सखोल अभ्यास करुन निर्णय घ्यावा. प्रतोदांबद्दलच्या निर्णयाबद्दल बोलायचं झाले तर अध्यक्ष त्यावर सुनावणी घेतील. त्यानंतर ठरेल की, पक्ष प्रतोद नेमका कोण असेल. हा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा आहे. कोर्टाने म्हटलं की त्याबाबतची फक्त प्रक्रिया चुकली आहे.
शिरसाट पुढे म्हणाले, 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नसल्याने विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण सोपवलं आहे. मात्र, ठाकरे गटात जे शिल्लक आमदार आहेत ते कुठे जाऊ नयेत यासाठी त्यांचा सगळा खटाटोप सुरु आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला पात्र ठरवले तर त्यांच्याकडे असलेले 14-15 आमदार त्यांना अपात्र ठरवावं लागेल. कारण पक्ष आमच्याकडे आहे, चिन्ह आमच्याकडे, अधिकारी आमच्याकडे आहेत. मग हे तिथे कसे राहू शकतात, त्यांना आमचा व्हीप लागू शकतो. आमचा व्हीप मान्य केला नाही तर ते अपात्र ठरू शकतात, असा तर्क संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.