जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२४
राज्यातील राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांनी आव्हान-प्रतिआव्हान दिल्याने आज दि.२८ तणावाची परिस्थीती निर्माण झाली. दरम्यान माध्यमांशी बोलत असताना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, ” आम्हाला करायचे असते तर एकही जिवंत घरी गेला नसता. आम्ही चिरीमिरी उद्योग करत नाही. निवडणूक जवळ आल्याने विरोधकांना राजकारण करायच आहे.”
मालवण-राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना माध्यमांशी बोलत असताना नारायण राणे म्हणाले, ” छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ढासळला ही घटना दुर्दैवी आहे. पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला. कोणावर आरोप दोष देण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोणी बांधला आणि बांधणारे लोक या सर्वांची चौकशी केली जाईल. तपासाअंती पुतळ नेमका कश्याने कोसळला हे पाहिलं जाईल, त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.”
पुढे बोलताना राणे म्हणाले, महाविकास आघाडी निवडणुका जवळ आल्याने या घटनेचे राजकारण करत आहेत.
या घटनेचे भांडवल करत आहेत. या जिल्ह्यात भाजपवर टीका करण्यासाठी कोणतेही कारण मिळत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला हे त्यांना निमित्त मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या जिल्ह्यात उभा राहीला गेला. पण आज (दि.२८) बाहेरुन आलेले त्यांनी एकतरी राष्ट्रपुरुषांचा पुतळा उभा तरी केला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.