मेष : कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आज चांगला वेळ जाईल. मित्रांसोबतची भेट फायदेशीर ठरेल. तुम्हाला सामाजिक आणि कौटुंबिक प्रोत्साहन मिळेल. अनोळखी व्यक्तीशी कोणतेही महत्त्वाचे संभाषण किंवा काम करण्यापूर्वी त्याची नीट चर्चा करून चौकशी करा. छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. व्यवसायात कोणत्याही प्रकारचा बदलाबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या.
वृषभ : तुम्ही तुमच्या प्रभावी संवादशैलीतून इतरांव प्रभाव कायम ठेवाल. घरात महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. अहंकाराची भावना नुकसानकारक ठरेल. तुमच्यातील गुणांचा सकारात्मक पद्धतीने वापर केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. प्रलंबित आर्थिक प्रश्न मार्गी लावण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा, असे श्रीगणेश सांगतात.
मिथुन : आज तुम्ही आर्थिक संदर्भात काही नवीन धोरणे आखाल. तुम्ही त्यात यशस्वी व्हाल, म्हणून प्रयत्न करत राहा. कौटुंबिक सुखसोयींवरही खर्च होईल. मात्र त्यामुळे बजेट बिघडू शकते. त्याची काळजी घ्या. घरातील एखाद्याच्या तब्येतीची चिंता राहील. त्यांची काळजी घेण्यासाठी तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढा. व्यवसायात अंतर्गत सुधारणा किंवा स्थान बदलण्याची गरज आहे.
कर्क – आज गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. खर्च जास्त होईल; पण उत्पन्नाचे साधनामुळे त्रास होणार नाही. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात थोडा वेळ व्यतित करा. खूप आत्मकेंद्रितपणा नातेसंबंधात दुरावा आणू शकतो. कार्यक्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तीचे योगदान तुम्हाला व्यवसायाशी संबंधित नवीन यश मिळवून देईल.
सिंह : आज अनोळखी व्यक्तीसोबतची भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मालमत्ता विक्रीबाबत विचार असेल तर त्यावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. न्यायालयीन प्रकरणामध्ये योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या, पती-पत्नीमध्ये किरकोळ मतभेद संभवतात. प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका.
कन्या : तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे समर्पित असाल. ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल. आज मनात काही नकारात्मक विचार येऊ शकतात. याचा तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. सकारात्मक लोकांसोबत वेळ व्यतीत करा. एकांतात आत्मपरिक्षण करा. व्यावसायिक क्रियाकलापांवर आपले पूर्ण लक्ष द्या. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : आज जास्तीत जास्त वेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात जाईल, असे श्रीगणेश सांगतात. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मदतीने मुलाच्या करिअरशी संबंधित कोणतीही समस्या सोडवल्यास यश मिळेल. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरेल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. काही दुखापत होण्याचीही शक्यता आहे. घरातील वातावरणात शिस्त पाळणे आवश्यक आहे.
वृश्चिक : तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदलांचे नियोजन कराल. तुम्ही तुमची कार्यक्षमता वाढवू शकता. धर्म आणि कर्माशी संबंधित बाबींमध्येही तुमचा हातभार लागेल. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेबाबत वाद वाढू शकतात. पैशाशी संबंधित कामे करताना काळजीपूर्वक विचार करा. रागावरही नियंत्रण ठेवा. सध्या कार्यक्षेत्रातील उपक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
धनु : आज बहुतेक कामे स्वतः नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुमचा प्रभाव कायम राहील. तुमच्या कामात व्यत्यय आल्याने निष्कारण काही वेळ वाया जाईल. तुमची ऊर्जा पुन्हा एकवटून तुम्ही तुमचे काम करू शकाल. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील.
मकर : धार्मिक संस्थांच्या कार्यातील सहभागामुळे मानसिक शांती लाभेल. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित योजना असतील. कोणत्याही कागदपत्र तयार करताना अधिक काळजी घ्या. एक छोटीशी चूक तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते. पैशाशी संबंधित प्रकरणे प्रलंबित राहू शकतात. पती-पत्नीचे नाते आनंदी राहील.
कुंभ : आज तुमची बहुतांश कामे व्यवस्थित पूर्ण होतील. अचानक आंतरिक शांतीचा अनुभव येऊ शकतो. नातेवाईक आणि शेजार्यांबरोबर संबंधात अधिक सुधारणा होईल. जवळच्या नातेवाईकाच्या वैवाहिक नात्यात विभक्त होण्याची परिस्थिती उद्भवू शकते. तुमचा संयम त्यांना अनुकूल ठरेल. उत्पन्नाच्या साधनांमध्ये थोडी घट होऊ शकते. व्यावसायिक कामांकडे पूर्ण लक्ष देणे खूप महत्वाचे आहे.
मीन : आज तुम्ही प्रत्येक काम व्यावहारिक पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मित्र आणि नातेवाईक देखील तुमच्या बुद्धिमत्तेचा आदर करतील. संततीच्या बाजूने कोणतेही समाधानकारक परिणाम मिळाल्याने घरात उत्सवाचे वातावरण असेल. तुमचा व्यावहारिक दृष्टीकोन कार्यक्षेत्रातील अनेक बाबी सोडवू शकेल. पती-पत्नीमध्ये काही वाद होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.