जळगाव मिरर / २ मे २०२३ ।
धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावातून घराला कुलूप असतांना ते तोडून अनोळखी चोरट्यांनी घरातून हजारो रुपयाचे सोन्यासह चांदीचे दागिने लंपास केल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एकलग्न येथील विजय योगराज पाटील(वय३४) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. दि १ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते कामानिमित बाहेर गेले असता त्यांनी घरच्या दरवाजाला कुलूप लावून गेले होते. यावेळेत घराला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत देवघरामध्ये असलेले कपाटाचे कुलूप तोडून घरातून ४८ हजारांचे सोन्यासह चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अरुण निकुंभ हे करीत आहेत.