
जळगाव मिरर | ९ मे २०२३

जळगाव तालुक्यातील एका मुख्य रस्त्यावरील हॉटेलच्या मागील बाजूस असल्याचा चोरट्यांनी फायदा घेत खिडकीतून आत प्रवेश करून २५ हजारांची रोकड लंपास केल्या प्रकरणी हॉटेल चालकाने तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील समर्थ कॉलनीतील रहिवासी असलेले विवेकानंद पाटील यांच्या मालकीचे जळगाव – यावल रस्त्यावर असलेले विदगाव येथे तापी गार्डन नावाने हॉटेल असून दि.५ मे च्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी हॉटेलच्या मागील बाजूने प्रवेश करून ड्रॉवरमधील २४ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ लक्ष्मण शिंदे करीत आहे.




















