जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२४
फैजपुर तालुक्यातील अकलूद येथे बंद घर अज्ञात चोरटयांनी फोडून घरातील हजारॊचा ऐवज लांबविल्याची घटना २९ रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अकलूद येथील राजेश गुनघरजी नखाते (जैन), क्य-45, व्यवसाय-प्रॉपर्टी ब्रोकर, हे पत्नी- ज्योती, मुले-तेजल व जय परिवारासह वास्तव्याला असून पापर्टी बोकरचे काम करुन उदरनिर्वाह करतात . 27 रोजी संध्याकाळी 06.30 वाजता अकलुद येथुन मुंबई येथे सेमीनारसाठी गेले असता ज्योती नखाते ह्या रात्री 9.30 वाजता अकलुद येथुन अकोला येथे गेली. 29. रोजी दुपारी 3 वाजेचे सुमारास नखाते हे मुंबई येथुन अकलुद येथे आले असता घराचे लोखंडी फाटकाचे गेटचे कुलुप उघडले व घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप उघडत घराचे मुख्य लोखंडी दरवाजाची जाळी चोरटयांनी कापलेली दिसली,
40,हजार रुपये किंमतीची एक सोन्याची अंगठी सुमारे, 10 ग्रॅम वजनाची , 60 हजार रुपये किंमतीच्या ३ सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी सुमारे ५ ग्रॅम वजनाच्या, 24 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी सुमारे 3 ग्रॅम वजनाच्या 1लाख रुपये किंमतीचे ५ कानातील सोन्याचे (एकुण 25 ग्रॅम वजनाच्या) जोड प्रत्येकी सुमारे ५ ग्रॅम वजनाचे 80 हजार रुपये किंमतीची एक 100 सोन्याचे मण्यांची पोत त्यात एक सोन्याचे डोरल्यांचे जोड सह (सुमारे 20 ग्रॅम वजनाची) त्यात काळे मणी असलेली 52हजार रुपये किमतीची एक सोन्याची पोत त्यात एक सोन्याचे डॉरल्यांचा जोड असा ऐवज चोरटयांनी चोरून नेला. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .