जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२५
शहरातील निमखेडी शिवारातील जिवरामनगर येथे कुलूपबंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करत सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी शिवार परिसरातील जिवरामनगरात संदीप रमेश पवार (वय ४१)हे कुटुंबासह येथे राहतात. ते बाहेरगावी गेल्याने घर बंद होते. ही संधी चोरट्यांनी हेरली. गुरुवारी दि.२ जानेवारी सकाळी दहा वाजेपासून ते शुक्रवार, ३ रोजी सकाळी सात वाजेदरम्यान चोरट्यांनी या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडला.
त्यानंतर आतमध्ये एण्ट्री केली. घरात मागील बाजूस असलेल्या बेडरूममधील लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला. हाती लागलेला मुद्देमाल घेत चोरट्यांनी पलायन केले. या घटनेत १० हजार किमतीची एक सहा ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, १२ हजार किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके, स्टाप्स दोन जोड, १८ हजार किमतीच्या दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या, चार हजार रुपये किमतीची चांदीची दहा भार वजनाची चांदीची चेन आणि २५ हजार रुपयांची रोकड, असा एकूण ६९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी तक्रारीनुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार श्रीकांत बदर हे करीत आहेत.