जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२३
हिवाळा सर्वाना खूप आवडत असतो पण काहीना याच दिवसात अनेक त्रास देखील होत असतात त्यातील एक म्हणजे सांधे दुखी मोठ्या प्रमाणत होत असते. स्नायूंची लवचिकता कमी होऊन सांधेदुखी, सांधे आखडणं अशा प्रकारचा त्रास होतो. अशावेळी हे तिन हिरवी पाने हिवाळ्याच्या दिवसांत वेदनांपासून आराम मिळवून देऊ शकतात. हाडांची मजबूती आणि सांध्यांचं कार्य योग्य पद्धतीने सुरु राहण्याकरिता सायनोव्हायल फ्लुएड गरजेचं असते. हा एक घट्ट द्रव पदार्थ असतो. हा पदार्थ सांध्यांच्या हालचालींसाठी मदत करतो आणि सांधे एकमेकांवर घासण्यापासून रोखतो.
कोरफड
कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कोरफडच्या पानांचा वापर वेदना कमी करण्यासाठी करु शकता. याच्या पानांचा गर काढून सांध्यांना लावा. असं म्हणतात की, कोरफडच्या पानांचा गर सूज आणि वेदना कमी करु शकते.
पालक
पालकमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. ते हाडांच्या बळकटीसाठी वापरले जातात. पालकचे नियमित सेवन केल्यास हाडांना बळकटी येते त्याचबरोबर सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो.
तुळशीची पाने
तुळशीची पाने बहुगुणकारी असतात. आयुर्वेदात तुळसीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. यात सूज कमी करण्याबरोबरच वेदनाशामक गुणदेखील असतात. तुळशीची पाने तुमच्या सांध्यांना आलेली सूज आणि वेदना कमी करतात.