जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३
गेल्या काही महिण्यापासून अभिनेत्री राखी सावंत हि आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आलेली असताना तिला चक्क पतीने दिला कोर्टात धमकी दिली आहे.
अभिनेत्री राखी सावंतच्या तक्रारीनंतर तिचा पती आदिल खानच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून राखीनं त्याच्यावर कौटुंबिक अत्याचार आणि तिच्याशी पैशाच्या व्यवहाराबाबत फसवणूक केल्याचे गंभीर आरोप लावले आहेत.
या प्रकरणासंदर्भात १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होती आणि अंधेरी कोर्टानं तेव्हा आदिलला चार दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली होती. चार दिवसांनंतर २० फेब्रुवारीला आज पुन्हा एकदा कोर्टात आदिलला हजर केलं गेलं . या दरम्यान कोर्टात आपल्या वकीलासोबत राखी सावंत देखील हजर होती. तिचे वकील अशोक सरावगी यांनी मीडियाशी बातचीत करताना सांगितलं की,”चार दिवसांच्या पोलिस कोठडीत काही गोष्टींविषयी चौकशी केली गेली. कोर्टाला वाटलं की आता चौकशीसाठी पोलिस कोठडी आवश्यक नाही. त्यामुळे आता पुन्हा आदिलला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे”
एका ईराणी महिलेनं आदिलवर लग्नाचं खोटं वचन देत रेप केल्याचा आरोप केला होता. तसा एफआयआर देखील दाखल केला गेला आहे. आता या प्रकरणातही आदिल खानच्या अडचणी वाढू शकतात. आदिलवर कलम ३७६ अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. तर राखीच्या वकीलांच्या म्हणण्यानुसार पोलिसांजवळ ट्रान्सफर वॉरंट आहे आणि या प्रकरणाची सुनावणी आता २४ फेब्रुवारी रोजी म्हैसूर कोर्टात होणार आहे. त्यामुळे आदिलला म्हैसूर कोर्टात नेलं जाईल अशी शक्यता आहे.
राखी सावंतनं पापाराझीशी बातचीत करताना सांगितलं की,”आज मी आदिलला कोर्टात पाहिलं तो मला अॅटिट्युड दाखवत होता. जेलमध्ये मोठ्या डॉन लोकांना भेटलोय…मी बाहेर आलो की विचार कर तुझं काय होईल”. राखीनं सांगितलं की आदिल तिला कोर्टात धमकी देत होता.