जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२४
राज्यासह अनेक जिल्ह्यात मुली, विवाहितेसोबत चुकीचे कृत्य करीत असल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच यावल तालुक्यातील एका गावात 36 वर्षीय महिला शौचास बसलेली असताना एका व्यक्तीने महिलेचा हात पकडून शेतात ओढून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या व्यक्तीने तिला विवस्त्र करून फोटो काढले. या प्रकरणी फैजपूर पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिला आपल्या परिवारासह राहत आहे. महिला दि. २३ रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर शौचालयाला गेली असता गावातील एकाने पिडीत महिलेचा हात पकडून तिला शेतात ओढून नेले. तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढले. त्यानंतर महिलेला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. संशयित आरोपी याने हा फोटो एका नातेवाईकाला पाठविला. त्या नातेवाईकाने तो फोटो पिडीत महिलेच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. हा प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनुसार एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दिन सैय्यद हे करीत आहे.