जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२४
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर विनयभंग केल्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच मुक्ताईनगर तालुक्यातील अशीच एका ३५ वर्षीय विवाहितेवर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात एका विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असून दि.२ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास याच गावातील एक संशयित आरोपी याने महिलेच्या घरात अनधिकृत प्रवेश करून विवाहितेसोबत चुकीचे कृत्य करीत असतांना विवाहितेने आरडाओरड केली असता विवाहितेला चाकू मारीन अशी धमकी देखील दिली. तर महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने महिलेने थेट मुक्ताईनगर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.संतोष चौधरी हे करीत आहेत.