जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२३
२० वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती परिवारासह तिच्या भावी पतीला देवून तरुणीची बदनामी करण्यात आल्याची घटना घडली आहे. तसेच तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्या तीन जणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात २० वर्षीय तरुणी रहिवासास असून तिचे शहरातील एका भागातील तरुणीचे लग्न ठरल्यानंतर संशयित तरुणासह त्याच्या मित्राने तरुणीच्या भावी पतीला जावून तरुणीच्या असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती दिली तसेच तरुणीसह तिच्या प्रियकराचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीही देत तिचा पाठलाग केला. याप्रकरणी पीडीत तरुणीने शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर तिघांविरोधात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक उपनिरीक्षक इकबाल अली सैय्यद करीत आहेत.