
जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील कंडारीत घडली होती. याठिकाणी तिहेरी हत्याकांड घडले होत या प्रकरणी दि. ४ रोजी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता तिघांना दि. ७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील संशयित आरोपी देविदास मधुकर पवार (वय ३०), अमोल रवींद्र कोळी (वय २४), मयूर लीलाधर तायडे (वय २२) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी या आधी तीन आरोपींना अटक केली होती. त्यांनाही न्यायालयाने दि. ७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, चार आरोपी अद्यापही फरार आहेत, अशी माहिती सरकारी वकील अॅड. नितीन खरे यांनी न्यायालयाला युक्तिवाद करताना दिली. कंडारी एकाच रात्रीत तीन जणांची हत्या करण्यात आली होती





















