जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील पित्याने चारित्र्याच्या संशयावरुन रागाच्या भरात स्वतःच्या दोन लहान मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्याची पत्नी हल्ल्यात बचावली असून जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथे संजय नाना सिंग पावरा (वय 23) 19 वर्षे आपल्या पत्नीसोबत दोन मुलांसोबत राहत होता. आरोपी संजय पावरा याचे दि. 18 रोजी पत्नी सोबत जोरदार भांडण झाले. त्यामुळे त्याची पत्नी मुलांसह मध्य प्रदेश मध्ये आत्याच्या घरी निघून गेली. संजय पावरा याच्या आई-वडिलांनी तिथे जाऊन भांडण केले. त्यामुळे नातेवाईकांनी तिला माहेरी मध्य प्रदेश मधील देवली येथे सोडून दिले.
त्यानंतर पती मुलाला घेऊन देवली येथे गेला व पत्नी सोबत जोरदार भांडण झाले व रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार करून मुलगा डेविड पाच वर्ष व मुलगी डिंपल तीन वर्ष यांना कुराडीने वार करून जागीच ठार केले व पत्नीवर पाच ते सहा वार केले. तेथील लोकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मध्य प्रदेश मधील वरला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीही गंभीर जखमी असल्याने धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.