जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यावेळी पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सहभागी होताना आ. एकनाथराव खडसे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सहा हजार अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नियमित आठ तास विज द्यावी, खानदेशात कृषी विद्यपीठाची स्थापना करावी, जळगाव येथे मंजूर असलेले शासकीय पशु वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्यात यावे ,कांदा उत्पादकांचे रखडलेले अनुदान वाटप करण्यात यावे, काल गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यात यावी, केळी पिक विम्याचा प्रश्न तातडीने सोडनविण्यात यावा ,वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळत होती ती बंद करण्यात आली असून ती पूर्वी प्रमाणे देण्यात यावी अशा विविध मागण्या केल्या.
यावेळी आ. एकनाथराव खडसे म्हणाले राज्यात शेतकरी बांधवाना कृषी विद्युत पंपासाठी आठ तास नियमित भारनियमनमुक्त विज देऊ अशी सरकारने वेळोवेळी घोषणा केली परंतु शेतकऱ्यांना आठ तास नियमित विज मिळत नाही ,ट्रान्स फार्मर जळतात ते एक दीड महिना उपलब्ध होत नाहीत ,कधी कंडक्टर वायर चोरी जाते त्यावर कुणाचे नियंत्रण नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी आठ तास नियमित विद्युत पुरवठा करावा
राज्यात शेतमालाला भाव नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांची वाईट स्थिती असून कापसाला प्रति क्विंटल सहा हजार पाचशे पर्यंत भाव मिळत आहे मागील वर्षी तो बारा हजार रुपये प्रति क्विंटल होता कापसाचा हंगाम संपत आला असून जिनिंग बंद होण्यावर आल्या आहेत तरी कापूस घ्यायला कोणी तयार नाही त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे त्यासाठी शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सहा हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली
पुढे बोलताना ते म्हणाले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन होऊन खांदेश साठी स्वतंत्र्य कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी आहे त्यासाठी मी कृषी मंत्री असताना राज्य शासनाकडे शिफारस होऊन प्रस्ताव सादर झालेला आहे परंतु त्याबाबत अजून कुठलीही हालचाल होत नाही
जळगाव किंवा धुळे येथे खांदेश साठी स्वतंत्र्य कृषी विद्यापीठाची स्थापना करावी अशी त्यांनी मागणी केली त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली असून जळगाव जवळ यासाठी जागा निश्चित झालेली आहे गेल्या अधिवेशनात पशुसंवर्धन मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधीस मंजुरी देण्यात येऊन तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही मंत्री महोदय हे निव्वळ आश्वासन देत असून आश्वासनाचे हे सरकार असून प्रत्यक्ष कृती मध्ये काम केल्याचे आठवत नसल्याचे सांगून त्यांनी सरकार वर टिका केली.
राज्यात कांदा उत्पादकांची स्थिती गंभीर असून दोन वर्षापूर्वी कांदा उत्पादकांचे नुकसान झाले त्यावेळी सरकारने कांदा हस्तक्षेप योजने अंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले होते परंतु ते काही भागात मिळाले काही ठिकाणी मिळाले नाही ते तातडीने वितरित करण्यात यावे अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली
काल सोमवार ला झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीट मुळे जळगाव जिल्हयातील अमळनेर, बुलडाणा जिल्हयातील मलकापूर, नांदुरा,संग्रामपूर जळगाव जामोद या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी श्री .खडसे यांनी केली वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झाल्यास आधी नुकसानभरपाई मिळत होती परंतु नविन शासन निर्णयानुसार ते बंद करण्याची घोषणा सरकारने केली आहे तो शासन निर्णय रद्द करून पुर्ववत नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी केली.
वारंवार आश्वासन देऊन सुद्धा केळी पिक विम्याचा प्रश्न सोडविण्यास सरकारला अपयश येत आहे जळगाव जिल्हयात तीन तीन मंत्री असून सुदधा केळी पिक विम्याचा प्रश्न अद्याप सुटत नाही आहे त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी नाराज असून त्यामुळे अनेक गावांत शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना येण्यासाठी बंदी घातली आहे तरी केळी पिक विम्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली