आजचे राशिभविष्य दि २५ जानेवारी २०२४
मेष : आर्थिक योजना बनवू शकता. कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवणे आनंदाचा मार्ग ठरेल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे.
वृषभ : धन लाभ होण्याची शक्यता. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल
मिथुन : हुशारीने गुंतवणूक करा. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होती. परंतु, त्याचा मन:शांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल.
कर्क : आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. काळजी घ्या. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नका. जोडीदारासोबत वाद होतील.
सिंह : धन लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी मनावर दडपण येईल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.
कन्या : धनहानी होण्याची शक्यता. बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. उद्योग व्यावसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खी होण्याची शक्यता अधिक.
तूळ : प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. आर्थिक लाभ होतील. मुलांकडून एखादी थरारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे.
वृश्चिक : धन लाभ होईल. तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी उदात्त आणि फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका आणि म्हणून घाबरू नका. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर रहा. तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल.
धनु : धन हानी होण्याची शक्यता. भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.
मकर : आर्थिक हानी संभवते. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. काही रचनात्मक कार्य करू शकतात. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे.
कुंभ : गुंतवणुकीतून फायदा. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करु शकतात. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल.
मीन : आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. छोटेसे दुर्लक्षदेखील प्रश्न गंभीर करू शकते. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. दिवस उत्तम आहे. व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात.