• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जून २०२६ 

वीकेंडचा आनंद घेण्यासाठी आणि श्री देव गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणपतीपुळे येथे आलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील तरुणांच्या गटावर काळाने घाला घातला. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या लाटांचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाच तरुण समुद्रात बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना शनिवारी घडली. हे पाचही तरुण सध्या बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर परिसरातील एकूण १९ जणांचा मित्रपरिवार पर्यटनासाठी कोकणात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून हा गट विविध पर्यटनस्थळांना भेट देत होता. शनिवारी सकाळी त्यांनी गणपतीपुळे येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काही तरुण पाण्यात उतरले. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास समुद्रातील वाढत्या लाटा आणि तीव्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही तरुण खोल पाण्याकडे ओढले गेले. काही क्षणांतच पाच जण समुद्राच्या प्रवाहात नजरेआड झाले. सोबतचे मित्र बुडत असल्याचे लक्षात येताच इतर पर्यटकांनी मदतीसाठी आक्रोश केला.

समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीप आदमाने (१९) आणि यश दामोदर कांबळे (२०) अशी आहेत. विशेष म्हणजे या पाच तरुणांपैकी तिघे पोलीस भरतीची तयारी करत होते. तर उर्वरित दोघेही आपल्या कुटुंबाचा आधार बनण्यासाठी संघर्ष करत होते. त्यामुळे या घटनेने संपूर्ण बिडकीन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेनंतर किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि जीवरक्षकांनी कोणतीही पर्वा न करता समुद्रात धाव घेतली. त्यांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या प्रयत्नांत तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र पाच जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

सध्या कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यामुळे समुद्र खवळलेला असून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. लाटांचा जोर आणि मागे खेचणारा प्रवाह यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तरीही स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव कार्य अधिक तीव्र करण्यात आले आहे. किनारी भागात विशेष पथके तैनात करण्यात आली असून समुद्रात शोधमोहीम सुरू आहे.

दरम्यान, गणपतीपुळे समुद्रकिनारा पावसाळ्यात धोकादायक ठरत असल्याने प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरणे टाळावे, तसेच जीवरक्षकांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. बेपत्ता तरुणांचा शोध लागावा यासाठी संपूर्ण बिडकीन गावासह परिसरातील नागरिक प्रार्थना करत आहेत.

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group