चाळीसगांव : कल्पेश महाले
नुकतेच कॅनडा येथे झालेल्या जागतिक पोलीस स्पर्धेत कुस्ती मध्ये सुवर्ण पदक पटकवणारे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय नथ्थु चौधरी यांनी गोंडगाव येथील पीडित कुटुंबाला मदतीचा हात पुढे करून आपल्यातील संवेदनशीलता दाखऊन दिली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान, जागतिक सुवर्णपदक विजेते, सध्या पुणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले विजय चौधरी यांनी गोंडगाव गावी जाऊन चिमुकली च्या घरी सांत्वन पर भेट दिली.
या भेटीत त्यांनी नुकत्याच कॅनडा येथे झालेल्या जागतिक पोलीस स्पर्धेत मिळालेल्या सुवर्ण पदक बरोबर एक लाख रुपये मानधन ची रक्कम या कुटुंबाला मदत म्हणून दिली. त्याच ठिकाणाहून सरकारी वकील उज्वल निकम साहेबांची फोनवर चर्चा करुन या चिमुकलीची केस तुम्ही लढवा अशी विनंती केली. व चिमुकलीच्या वडिलांना धिर देत सांत्वन पर भेट घेतली. आणि चिमुकलीच्या वडिलांकडूनच मेडल गळयात टाकूनखऱ्या अर्थाने चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण केली. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स २०२३ कॅनडा येथे नुकत्याच झालेल्या कुस्ती स्पर्धेत १२५ किलो वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त करुन विश्वविजेता झालेले विजय चौधरी यांनी गोंडगाव नगरीत सर्व मित्रपरिवारासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटना पूर्णपणे समजून घेतली आणि अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असल्याने वरिष्ठांशी चर्चा करून निश्चित या घटनेस सहभाग घेऊन गुन्हेगारास फाशीची शिक्षा होईलच यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.वास्तविक पाहता कॅनडातील जागतिक पोलीस स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल महाबली श्री विजय भाऊ चौधरी यांची महाराष्ट्रातील सर्व कुस्ती प्रेमींनी वेगवेगळ्या ठिकाणी भव्य दिव्य मिरवणूक आयोजित केली होती. पण गोंडगाव येथील घटना माहीती पडताच त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून, गोंडगाव येथे घटनास्थळी येऊन चिमुकलीच्या परिवाराचे सांत्वन करून आर्थिक सहकार्य केले. या माध्यमातून त्यांनी आपल्यातील संवेदनशीलता दाखवून दिली आहे.