जळगाव मिरर | १६ जून २०२५
भुसावळ शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वेस्टन हॉटेल समोर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार, तर रिक्षाचालकासह तिघेजण जखमी झाल्याची घटना आज दि. १५ रविवार रोजी पहाटे तीन वाजता घडली. ट्रक चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार ट्रक क्रंमाक एमएच ३७- टी-६७७१ वरील चालक अजहर खान सखाउल्ला खान (रा. समतानगर, कारजा लाड, जि. वाशीम) हा भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगाने जात असताना वेस्टन हॉटेल समोरून निघणाऱ्या पिकअप एमएच-१९- सी वाय – ४५७६ ला जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअप चालक राजू गुलाब अवतारी (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा जागीच ठार झाला. या ट्रकने पुढे जाऊन रिक्षा क्रंमाक एम एच१९- सी डब्ल्यू २९५० ला देखील मागून जोरात धडक दिली. या धडकेत रिक्षा सुमारे ५० मीटर अंतरापर्यंत ओढली गेली. रिक्षाचालकासह त्यामध्ये बसलेले गणेश तळेले व त्यांचा मुलगा ऐश्वर्य गणेश तळेले, मुलगी सारीका गणेश तळेले वय २०, जखमी झाले असून, त्यांना तातडीने १०८ अॅम्बुलन्सद्वारे भुसावळ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले. पिकअपमधील मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या प्रकरणी रिक्षाचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक अजहर खान सखाउल्ला खान (रा. समतानगर, कारजा लाड, जि. वाशीम) याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि आमित कुमार बागुल यांचे मादर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे करीत आहे.
पुणे येथे उच्च शिक्षण घेत असलेली सारीका भुसावळमार्ग वरणगावला येत असताना झालेल्या एका भीषण अपघातात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यासोबत असलेले रिक्षाचालक, वडील आणि त्यांचा मुलगा हे दोघेही जखमी झाले आहेत. सारीका दोन दिवसांच्या सुट्टीसाठी घरी येत होती. पुण्याहून ती भुसावळपर्यंत आली होती आणि तेथून रिक्षाद्वारे वरणगावकडे निघाली असताना हा अपघात घडला. रिक्षा व एका अन्य वाहनाचा जोरदार धडक होताच रिक्षा उलटली आणि तिघेही त्यात अडकल्याने गंभीर जखमी झाले. सध्या तिघांवर जळगाव रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
