
जळगाव मिरर | १९ जून २०२४
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त नेहमीच जात असतात, याच तुळजाभवानी मंदिर मंदिराची पुनर्बांधणी व जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला असून नवीनगाभारा उभारणार आहे. यात सोने व चांदीचा उपयोग केला जाणार आहे. सिंहासनालाहीसोने व चांदीचा मुलामा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पुरातत्व विभागाचे मार्गदर्शनव सल्ल्यानुसार हे बदल केले जातील. पुरातत्व विभागाच्या मदतीने तुळजाभवानी मंदिरातील जुन्या बांधकामाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी तडे गेलेले दगडी खांब काढून नवीन खांब बसवण्यात येतील. मात्र, मंदिराचा मूळ पोत बिघडणार नाही याची काळजीघेणार. यासाठी ५५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
तुळजाभवानी मंदिर परिसरात बाह्य सुविधा सक्षमतेने निर्माण करण्यात येत आहेत. मात्र, आंतरिक सुविधा उभारणीत अडचणी येतहोत्या. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने आतामंदिराची पुनर्बांधणी अर्थात जिर्णोद्धारकरण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारीडॉ. ओम्बासे यांनी सांगितले की, यामध्येमंदिराच्या मुख्य मंडपाचे खांब बदलण्यातयेणार आहेत. या दगडी खांबांना अनेकवर्षांपासून तडे गेले आहेत. पुरातत्त्व विभागाच्यामदतीने तडे गेलेले खांब बदलले जातील.






















