जळगाव मिरर । २८ जानेवारी २०२३ ।
देशात हवाई विमानाचा मोठा अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-30 आणि मिराज 2000 एकमेकांना धडकली आणि अपघात झाला. दोन्ही विमानांची टक्कर झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी पडल्याची शक्यता आहे. एक विमान मध्य प्रदेशातील मुरैना येथे तर दुसरे राजस्थानमधील भरतपूर येथे कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. पण सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही. कोणते विमान कुठे पडले हे देखील कळू शकलेले नाही. अपघातात कोसळलेल्या दोन्ही लढाऊ विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते.
ग्वाल्हेर एअरफोर्स स्टेशनवरून हवाई दलाच्या दोन विमानांचे टेकऑफ झाल्याची माहिती मिळाली होती. यापैकी एक पहाडगडमध्ये कोसळले आहे. दुसरे विमान मानपूरजवळ कोसळल्याची माहिती आहे. आम्ही दुसऱ्या विमानाचा शोध घेत आहोत. मुरैना जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांच्यानुसार, तीनपैकी दोन पायलट वाचले आहेत. मात्र घटनास्थळावरून अशी काही छायाचित्रे मिळाली आहेत, ज्यावरून कुणाचा तरी मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.