
जळगाव मिरर / २ मे २०२३ ।

शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका ठिकाणाहून वायरमन तरुणाची दुचाकी लंपास झाल्याप्रकरणी शहर पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगर परिसरातील वाटिका आश्रम परिसरातील रहिवासी किशोर विठ्ल पवार (वय २९) हे एमएसईबीमध्ये वायरमन म्ह्नणून कार्यरत आहेत. दि.२९ रोजी ते बिग बाजार परिसरातील रेल्वे स्थानकाच्या पार्किग बाहेर लावलेली दुचाकी क्र.एमएच.यु.१९.डीए.२५०१ हि सुमारे ३० हजार रुपये किमतीची अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास योगेश पाटील हे करीत आहेत.




















