अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील एका परिसरातून घरासमोर लावलेली दुचाकी अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्या प्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बोरसे गल्लीत अबुबकर सलीम बागवान हे याठिकाणी वास्तव्यास आहे. दि १ फेब्रुवारी रोजी त्यांनी आपली दुचाकी आपल्या घरासमोर लावलेली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी क्र.एम.एच.१९.बी.आर.३२८६ हा क्रमाक असलेली १२ हजार रुपये किमतीची अनोळखी चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी त्यांनी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.चंदकांत पाटील हे करीत आहेत.