जळगाव मिरर | २७ जुलै २०२४
वाघूर पंपिंग व उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत वाहिनीवरील झाडांच्या फांद्या तोडणे व विद्युत वाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. नियोजन कोलमडल्यामुळे २७ रोजीचा पाणीपुरवठा २८ रोजी तर २८ रोजीचा २९ तर २९ रोजी ज्या भागात पाणी पुरवठा होणार होता, तो ३० जुलै रोजी होणार आहे.
रविवारी या भागात होणार पाणीपुरवठा
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड व परिसर. नित्यानंदनगर टाकी परिसर मोहननगर, नेहरूनगर परिसर, खंडेरावनगर परिसर- हरीविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, मानराज टाकीवरील भाग- दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी.
खोटेनगर टाकीवरील भाग- द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्री नगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकीवरील शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस.एम.आय.टी. परिसर. डायरेक्ट योगेश्वर नगर, हिरा पाईप व शंकरराव नगर व खेडीगांव परिसर. डी.एस.पी. टाकी तांबापुरा, गणपती नगर, आदर्शनगर व इतर परिसर. शिवकॉलनी, विदयुत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग. अयोध्यानगर पहिला दिवस- गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौ. सोसा., जगवानीनगर मेहरुण पहिला दिवस सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगरात पाणी पुरवठा होईल.