जळगाव मिरर | १३ जुलै २०२४
विचार वारसा फाउंडेशन आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व नवीन मतदार नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महिलांसाठी अधिक प्रकारे सोप्या पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सहायता मदत कक्ष उभारण्यात आला आहे.
मेहरूण परिसरातील २०० महिलांनी आपली संपूर्ण माहिती भरुन विचार वारसा फाउंडेशनच्या मदत कक्ष कडे जमा केले. नविन मतदार याचेही १५० अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आले. मदत कक्षासाठी विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख,अध्यक्ष आशिष राजपूत, अभिजित राजपूत, मयुर डांगे, अमोल ढाकणे, अजय मांडोळे, ऋषिकेश राजपूत, गौरव डांगे, संकेत म्हस्कर, मनिष चौधरी, चेतन राजपुत, अक्षय गवई, लोकेश निकम यांच्यासह संपूर्ण विचार वारसा फाउंडेशनच्यापरिश्रम घेतले