जळगाव मिरर | ११ नोव्हेंबर २०२४
येथील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी येथील विचार वारसा फाउंडेशनतर्फे मतदार नाव नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. आता ज्यांची मतदान कार्ड आली आहेत, त्यांच्या घरी वाटप करण्याचे काम फाउंडेशनतर्फे कार्यकर्ते करीत आहेत.
विचार वारसा फाउंडेशनतर्फे मतदानासाठी अधिक टक्का वाढावा यासाठी जनजागृतीपर विविध शिबिर घेण्यात आले होते. त्यामध्ये नवीन मतदार नोंदणी शिबिर देखील संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या संकल्पनेतून मोठ्या संख्येने पार पडले होते. याची फलश्रुती म्हणून आता अनेक मतदारांची मतदान कार्ड आलेली असून ती त्यांना घरपोच पोहोचवण्याच्या काम विचार वारसा फाउंडेशनचे कार्यकर्ते आता करीत आहेत.
यामुळे रामेश्वर कॉलनी परिसरातील नागरिकांनी विचार वारसा फाउंडेशनला धन्यवाद देऊन मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लावू आणि आमचे राष्ट्रीय कर्तव्य पाडू अशी माहिती दिली आहे. शिबिरासाठी व मतदान कार्ड वाटप करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष-विशाल देशमुख,आशिष राजपूत,मयुर डांगे,अभिजित राजपूत,ऋषि राजपूत,आकाश तोमर,संकेत म्हस्कर,अक्षय गवई, गौरव डांगे, मनिष चौधरी,निखिल शेलार,अमोल ढाकणे,अजय मांडोळे,चेतन राजपूत,तेजस पाटिल,मितेश वाघ,भुमेश पाटिल,राहुल पाटिल,आदी परिश्रम घेत आहेत.