जळगाव मिरर | ३ जून २०२३
जळगाव-पाचोरा रोडवरील शिरसोली गावाजवळ असलेल्या झुलेलाल वॉटर पार्क मध्ये फिरण्यासाठी आलेल्या युवकांनी दुसऱ्याचे कपडे आणुन कपड्या वरील पैसे परत घेण्याच्या वादातून वॉटर पार्क मधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी करून बेदम मारहाण केली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण घटनास्थळावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे. तर मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी झुलेलाल वॉटर पार्क चे संचालक नीरज जेस्वानी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
जळगावत असलेल्या शिरसोली रस्त्यावरील एकमेव झुलेलाल वॉटर पार्क येथे गेल्या 29 मे सोमवार रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास वॉटर पार्क फिरून झाल्यावर युवकांनी आपली कपड्याची रक्कम परत मागण्याच्या कारणावरून वॉटर पार्क मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची हुज्जत घालण्यात आली. यावेळी जळगावतील भवानी पेठ येथे राहणाऱ्या आर्यन प्रितेश भावसार यासह आई-वडील व भाऊ याच्यासह नातेवाईकांसोबत सोमवारी वॉटर पार्क मध्ये फिरण्यासाठी आला होता. यावेळी आर्यन भावसार याचा चुलत भाऊ ओम भावसार याच्याशी याच ठिकाणी असलेल्या वॉटर पार्कच्या कर्मचाऱ्यांसोबत कपडे बदलण्याच्या कारणावरून बळजबरीने आरडाओरडा करून वाद निर्माण केला. तर वॉटर पार्कचे कर्मचारी समजूत घालत असताना दमदाटी करून कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रसंगी हा संपूर्ण घडलेला प्रकार वॉटर पार्कच्या जवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे. यात आर्यन भावसार व त्याचा चुलत भाऊ ओम भावसार यासोबत यांचे आई-वडील भाऊ आणि नातेवाईक अशा सर्व मिळून एकत्रितपणे वॉटर पार्कच्या कर्मचाऱ्यावर मारहाण करून कर्मचाऱ्यांना दुखापद देखील झाली असून याबाबत आम्ही व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांना दाखवले आहे. उलट आमच्या कर्मचाऱ्यांवर आरोप करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र संबंधितांनी रचले असून व्हिडिओ चित्रीकरणानुसार आम्ही पोलिसांना आमच्या वॉटर पार्कमध्ये अनुधिकृतपणे आरडाओरडा करून कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करीत आहोत. या संपूर्ण घटनेचा आढावा आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला यावेळी पत्रकारांची झुलेलाल वॉटर पार्कचे संचालक निरज जेस्वानी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.