जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे. तर रावेर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूकीत धनंजय चौधरी आणि अमोल जावळे हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. आजच्या निकालात दुसऱ्या फेरीत ८५५५ यांना मतांची आघाडी मिळालेली आहे.
रावेर विधानसभा भाजपतर्फे अमोल हरीभाऊ जावळे यांना आधीच तिकिट जाहीर झाले. तर काँग्रेसने धनंजय शिरीष चौधरी यांना उमेदवारी दिली. प्रहार जनशक्ती पक्षाने अनिल छबीलदास चौधरी यांना तर वंचित बहुजन आघाडीने शमीभा पाटील यांना मैदानात उतरवले.