जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२५
अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती अजय देवगणच्या मुख्य भूमिकेतील ‘आझाद’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटातील ट्रेलर आणि गाण्यांमध्ये राशाने चांगली छाप सोडली आहे, आणि तिचं पहिलं गाणं सोशल मीडियावर तुफान हिट होत आहे. राशाचा डान्स आणि हावभाव पाहून तिला स्टारकिड्सच्या यादीत एक महत्त्वाचं स्थान मिळवणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अशातच राशाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एकीकडे राशाचं मेकअप सुरू आहे, तर दुसरीकडे ती समोर पुस्तक ठेऊन बारावीच्या बोर्ड परीक्षा तयार करताना दिसतेय. व्हिडीओमध्ये मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट राशाला शॉटसाठी तयार करत आहेत, आणि त्या वेळी ती आपल्या अभ्यासावर लक्ष देताना दिसते.
व्हिडीओमध्ये तिच्या कामाची दृश्य एकदम मनोरंजक आहे. एक व्यक्ती तिला विचारते, “राशा, तू शूटिंगसाठी तयार आहेस का? तू हे काय करतेय?” त्यावर राशा हसत कॅमेरात बघून सांगते, “मी अभ्यास करतेय.” त्या व्यक्तीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, “शॉटसाठी जाण्यापूर्वी अभ्यास करतेस का?” तर राशा उत्तर देते, “माझ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी फक्त दहा दिवस उरले आहेत. मी भूगोल वाचतेय.”
राशाच्या या मेहनतीचं कौतुक करणारे काही नेटकरी तिच्या व्हिडीओवर चांगली प्रतिक्रिया देत आहेत, तर काहींनी तिचं मजेशीर ट्विस्ट करत असं म्हटलं आहे की, “असं वाटतंय अभ्यास करण्याचंही अभिनय करतेय.” काहींनी तिला “इंडस्ट्रीतत यायची इतकी घाई का आहे? आधी शिक्षण पूर्ण कर” असा सल्लाही दिला आहे.