जळगाव मिरर | १२ जून २०२५
आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली म्हणत बेबाबाई भालेराव (वय ५५, रा. पिंप्राळा हुडको) या महिलेला चौघांकडून बेदम मारहाण करुन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना दि. १० रोजी पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणारे बेबाबाई भालेराव यांना त्या परिसरात राहणाऱ्यांनी आमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार का केली म्हणत वाद घातला. त्यांच्यातील वाद वाढतच गेल्याने संशयित किरण सोये, अमोल सोये याच्यासह इतर दोघांनी बेबाबाई यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी अमोल सोये यांनी त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले. दरम्यान त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार किरण अर्जुन – सोये, अमोल अर्जुन सोये यांच्यासह इतर दोन अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ योगेश माळी हे करीत आहे.
