
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील एका २७ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्रामच्या मैत्रीतून तब्बल ६ लाखांत फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील एका गावातील २७ वर्षीय तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर DR.mark नामक व्यक्तीने आधी मैत्री केली. त्यानंतर तीचा व्हॉट्सअपवर बोलत विश्वास संपादन केला. यानंतर तरुणीला गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगून वेळोवेळी तिच्याकडून तब्बल ६ लाख ४९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर मागवले. तसेच पैसे ऑनलाईन स्विकारून कोणतेही गिफ्ट न पाठवता तरुणीची फसवणूक केली. याप्रकरणी DR.mark नामक व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नी.लीलाधर कानडे हे करीत आहेत.





















