यावल : प्रतिनिधी
शहरात महिलेच्या झालेल्या खून प्रकरणाला आधीच्या हल्ल्याची किनार असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील परिसरात शनिवारी 27 ऑगस्ट सायंकाळी उशीरा नाजीया जलील काझी ( वय ३५, रा. काजीपुरा) या महिलेवर कुर्हाडीने वार करून जागीच ठार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, नाजिया खलील काझी यांच्या हत्या प्रकरणामागे आधीच्या हल्ल्याची किनार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एक संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. नाजीया काझी यांच्यावर कुर्हाडीने दोन वार केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.