तुम्हाला नेहमी आपल्या परिसरातील वृक्ष हे काही तरी महत्वाचे देत असते, पण आपणा त्यावर सातत्याने दुर्लक्ष करीत असतो, तसेच शेवग्याचं झाड कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून रक्षण मिळू शकते. उत्तम आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याच्या पानांचा आहारात समावेश केला जातो. आरोग्यासाठी फायदेशीर असलेला शेवगा त्वचेवर चमक येण्यासाठी आणि केस दाट होण्यासाठीही फायदेशीर असतो. त्वचा आणि केसांसाठी शेवग्याची पानं म्हणजे वंडर ग्रीनच आपण म्हणू शकतो. शेवग्याच्या पानांचा वापर करुन आपण बीपी सारख्या समस्येवर मात मिळवू शकतो. त्याच प्रमाणे उत्तम त्वचा देखील मिळवू शकतो. शेवग्याच्या पानांचा वापर तुम्ही हेअर मास्क, स्क्रब आणि फेस मास्क म्हणून केला जातो, जो तुम्ही स्वतः घरी बनवू शकता. तुम्ही त्याचा नियमित वापर केल्यास तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल. चला तर मग या वंडर ग्रीनचे महत्त्व जाणून घेऊयात.
शेवग्याचे फायदे
थंडीमध्ये शेवग्याच्या शेंगाचे जास्त महत्त्व असते. शेवग्याच्या शेंगेमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. यामुळे केसांना आणि त्वचेला चमक येते.
शेवगेच्या शेंगेमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात त्यामुळे त्वचा चिरतरुण राहते. त्वचेवर डाग तयार होत नाही.
शेवगेच्या शेंगेमध्ये फॉलिक अॅसिड आणि अमीनो अॅसिडचा समृद्ध स्रोत देखील आहे जे केस आणि त्वचा दोन्ही हायड्रेट ठेवते.
निस्तेज त्वचा उजळण्यासाठी शेवगेच्या शेंगे देखील प्रभावी आहे कारण त्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते.
हेअर मास्क
केसांच्या वाढीसाठी तुम्ही शेवगेच्या शेंगांचा वापर करु शकता. यासाठी तुम्ही शेवग्याची पान वाळवून त्यांची पावडर बनवू शकता. हे पेस्ट तुम्ही केसांना लावू शकता. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
याशिवाय या पावडरमध्ये तुम्ही दही आणि आवळा पावडर टाकू शकता. यासाठी दह्यात पानांची पावडर किंवा पानांची पेस्ट घाला. नंतर आवळा पावडर देखील घाला. हलक्या हाताने हे मिश्रण केसांना लावा त्यानंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा
शेवग्याच्या बियांचे तेल
शेवग्याच्या बियांचे तेल देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल केसांनाही लावता येते. ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे, त्यांनी रोज रात्री तुम्ही हे तेल लावू शकता. त्याच प्रमाणे फाटलेल्या ओठांना देखील तुम्ही हे मिश्रण लावू शकता. यामुळे थंडीमध्ये जास्त फायदा होतो.
शेवग्याचे स्क्रब
शेवग्याचे स्क्रब बनवायलाही खूप सोपा आहे .यासाठी तुम्ही ओट्सच्या पावडरमध्ये शेवग्याच्या पानांची पावडर मिसळा. गुलाबजल मिसळून दोन्हीचा स्क्रब तयार करा. हा पॅक तुम्ही संपूर्ण शरीराला लावू शकता.
