जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुलगी असो वा विवाहित तरुणी अशा अनेक घटनामध्ये यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय विवाहिता आपल्या मुलासह वास्तव्यास असून ती शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील महेंद्र गोविंद गुजर याने महिलेला मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच याला प्रतिकार केला असता महिलेवर विळ्याने वार करून हाताला दुखापत केली आहे. हा प्रकार गेल्या दिड महिन्यांपासून ते 29 ऑगस्ट रोजीच्या रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडला. पीडीतेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महेंद्र गुजर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहेत.