जळगाव मिरर : २४ ऑक्टोबर २०२४
मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणुन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
सकाळी त्यांनी श्री संत आदिशक्ती मुक्ताई, नागेश्वर महादेव मंदिर, भवानी माता मंदिर, श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र येथे दर्शन घेतले. त्यांनंतर प्रवर्तन चौक येथे महापुरुषांच्या पुतळ्याना अभिवादन करून नामांकन रॅली काढण्यात आली रॅली नंतर जे डी सी सी बँकेजवळमा जी मंत्री आ एकनाथराव खडसे माजी मंत्री गुलाबराव देवकर,आ शिरीष दादा चौधरी,जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, माजी आमदार अरुण पाटिल, विनोद तराळ,उदय सिंह पाटिल,मनोहर खैरनार, अविनाश पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभा संपन्न झाली
यावेळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांचा आवाज बनुन त्यांचे प्रश्न विधानमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी अपुर्ण सिंचन योजना पूर्णतःत्वास नेऊन मतदारसंघ सुजलाम सुफलाम करून एक नविन विकास पर्व सुरू करण्यासाठी जनसामान्यांच्या आशीर्वादाने आपली उमेदवारी असुन
सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला
याप्रसंगी हजारो नागरिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते