
जळगाव मिरर | १३ मे २०२६
शिवीगाळ करणाऱ्या समजविण्यासाठी गेलेल्या महिलेस तिचा मुलगा तुषार हरिचंद्र नवले (वय २४, रा. विनायक नगर, खेडी, ता. जळगाव) या तरुणावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १० मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास खेडी येथे घडली. याप्रकरणी संशयित चेतन सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडी येथे राहणारा तुषार नवले या तरुणाला त्याच गावातील चेतन सोनवणे याने दि. १० मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तुषार याची आई ही संशयिताला समजविण्यासाठी गेली असता, त्यांना देखील संशयिताने शिवीगाळ केली. तसेच त्याने कमरेला लावलेला धारदार चाकूने तुषार नवले याच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. जखमी नवले याने दि. ११ मे रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ किशोर निकुंभ करीत आहे





















