जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२४
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्याची दुचाकी घसरुन गटारीत पडली. या अपघातात दुचाकीस्वार कैलास रंगला बारेला (वय ३०, रग़ रावल्यामाल, जि. बडवाणी, ह. मु. पाळधी, ता. धरगणाव) यांचा मृत्यू झाल्याची घटना किनोद गावाजवळील वळणावर घडली होती. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील कैलास रंगला बारेला हा धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे वास्तव्यास आहे. दि. १५ ऑक्टोंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास (एमएच १९, ईजी ४७९२) क्रमांकाच्य दुचाकीने किनोद गावाच्या दिशेने जात होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत दुचाकीने भरधाव वेगाने जात असतांना गावाच्या अलीकडे असलेल्या शेतीसंघाच्या पेट्रोलपंपाजवळील वळणावर त्याच्या दुचाकीचा अपघात होवून दुचाकी गटारीत पडली. या अपघातात दुचाकीस्वार कैलास बारेला याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामजी जुगी बारेला याने दिलेल्या तक्रारीरुन मयत दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहे.