
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
तालुक्यातील धाबे पिंपरी येथून एक युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी आकाश रमेश बेलदार (रा. धाबे पिंपरी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यास अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेबाबत आकाशचे वडील रमेश भीमराव बेलदार यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरात तपास सुरू असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आकाश रमेश बेलदार याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. तसेच रमेश भीमराव बेलदार (मो. 8329104531) यांच्याशीही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.




















