जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४
भुसावळ तालुक्यातील एका शिवारात किरकोळ वादातून भावेश अनिल भालेराव (वय २५) या तरुणाच्या डोक्यात आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करीत खून केल्याची घटना झेटीएस भागात घडली. तर दुसऱ्या घटनेत तरुणावर कुन्हाडीने वार करीत गंभीर जखमी केले. या दोन्ही घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात मित्रांमध्ये झालेल्या वादातून भावेश अनिल भालेराव रा. भगवान साळवे नगर, या तरुणाच्या डोक्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत खडका रोडवरील ताज हे अर सलून दुकानाजवळ कोणत्या तरी कारणावरून तिन जणांमधे वाद सुरू होता. यामध्ये एका अजीम शेख (वय ३५, रा. ग्रमीन पार्क बिसमील्ला चौक खडका रोड) या तरुणावर कुन्हाडीने वार करुन पसार झाले. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनचे आधिकारी कृष्णा पिंगळे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोहेकॉ बंटी कापडने, जावेद शाह, समाधान पाटील, यासीन पिंजारी, विजय नेरकर, निलेश चौधरी यांनी भेट दिली. दोन संशयीतांना पोलिसानी ताब्यात घेतल्याचे समजते, दोघे घटनेमधील संशयीत आरोपींचा पोलिस शोध करीत आहे. याप्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.