जळगाव मिरर । १३ ऑगस्ट २०२३
धरणगाव तालुक्यातील विहीर फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेल अंजनी गार्डनच्या मागील बाजूला जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती परीक्षा विधीन अधिकारी आप्पासाहेब पवार यांना मिळाल्यावर त्यांनी तात्कळ तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिस व धरणगाव पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१३ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास छापा टाकून १८ हजार रुपयांची रोकड चार मोटरसायकलीसह चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी तथा परिविक्षा अधिकारी आप्पासाहेब पवार यांना गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल मोती पवार, सत्यवान पवार, शैलेश सूर्यवंशी, नयन पाटील, प्रवीण पाटील, भूषण सपकाळे, तुषार जोशी, जितेंद्र सोनवणे, हिरालाल सिताराम घुमळकर आदींच्या पथकाने जळगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच धरणगाव पोलीस स्टेशन येथे हजर होऊन त्यांनी विहीर फाटा जवळ असणाऱ्या हॉटेल अंजनी गार्डनच्या मागे एका पत्राचे शेडमध्ये ज्यांना मना नावाचा जुगार खेळताना आढळून आले पोलीस आल्याची चावल लागतात यातील काही जण पसार झाले. या कारवाईत सुरेश चौधरी रा. झुरखेडा, छोटू चौधरी, जगन्नाथ उर्फ विनोद मधुकर पाटील, रा. तरडे, ईश्वर संतोष पाटील, रा. झुरखेडा या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच नारायण भिल, विलास चौधरी हे दोघे फरार झाले . या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी १७ हजार आठशे रुपये रोख एक बुलेट आणि तीन मोटरसायकली असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस करीत आहे.