
अमळनेर : विक्की जाधव
देशात सुरु असलेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा नुकतीच महाराष्ट्रात आली आहे. या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करीत आहे. तर १८ रोजी शेगाव येथे गांधी यांची भव्य सभा होणार असून यासाठी अमळनेर शहरासह तालुक्यातील हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहे.
यासाठी एसटी महामंडळाच्या 26 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्त होणाऱ्या सभेला जाण्याच्या नियोजनासाठी अमळनेर तालुक्याची दिनांक 18 रोजी बैठक आंबेडकर पतसंस्थेच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी अमळनेर शहर व तालुक्यात मिळून एसटी महामंडळाच्या 26 बसेसचे नियोजन झाले आहेत.
अमळनेर शहराच्या 10 बसेस तसेच ग्रामीण ग्रामीण भागातून 16 बसेसचे नियोजन झालेले असून सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन बद्ध कार्यक्रम आखून जाण्याचे नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचा विचार विनिमय झाला. यावेळी प्रवासा दरम्यान नागरिकांना जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी स्वनिधीतून कार्यक्रम करण्याचे आयोजिले आहे. सभा सर्वांना मिळून यशस्वी करून राहुल गांधीजींचे हातात बळकत करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष मनोज पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी. डी. पाटील, जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचना वाघ, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष तुषार संदानशिव, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष भागवत गुरुजी, माजी सभापती संदीप मल्हारी पाटील, ज्येष्ठ नेते धनगर दला पाटील, शांताराम बापू पाटील, मगन पाटील, प्रवीण जैन, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, प्राध्यापक श्याम पवार, प्रताप आबा पाटील, माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, गजेंद्र साळुंखे, जुबेर पठाण, हर्षल जाधव, मयूर पाटील व आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.




















