
जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२
राज्यातील भाजप नेते प्रसाद लाड व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील थोर महापुरूषांचा अवमान केल्या प्रकरणी आज जळगावात शिवसेनेच्या युवसेनेने त्यांच्या प्रतिमेवर काळे फासून निषेध नोंदविला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील ठाकरे गटाच्या युवसेनेतर्फे राज्यात भाजप नेते व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी युवसेना जळगावात चांगलीच आक्रमक झाल्याची चित्र दिसून आले. यावेळी युवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी जळगाव शहर मनपा इमारती बाहेर निषेधाच्या घोषणा देत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात ही आंदोलन केले.
यांनी केले आंदोलन
शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी युवासेना जिल्हा प्रमुख पियुष गांधी , उपजिल्हा अधिकारी विशाल वाणी, जिल्हा चिटणीस अंकित कासार , महानगर अधिकारी अमोल मोरे , महानगर समन्वयक महेश ठाकूर , विधानसभा युवाधिकारी अमित जगताप , कॉलेज कक्ष प्रमुख प्रीतम शिंदे , शहर अधिकारी गजेंद्र कोळी , उपमहानगर अधिकारी मयूर गवळी आणि अजिंक्य कोळी , विभाग अधिकारी ऋषिकेश शर्मा आणि नीरज चौधरी कॉलेज कक्षाचे युवासेना कॉलेज कक्ष अधिकारी जळगाव जयेश नेवे,युवासेना कॉलेज कक्ष जळगाव समन्वयक यश राठोड,युवासेना कॉलेज कक्ष अधिकारी जळगाव ग्रामीण प्रवीण भगत,युवासेना कॉलेज कक्ष शहरप्रमुख धरणगांव तुषार न्हाळदे, हिमांशू सिसोदिया गौरव जैन जय कपूर, परेश चोपडा , यश बारी , सुशील पाटील , आदी युवासैनिक उपस्थित होते.





















