
जळगाव मिरर । १२ डिसेंबर २०२२
मेहरूण परिसरातून दोन दिवसापूर्वी ३३ वर्षीय तरूण बेपत्ता झाला होता तर आज दि १२ रोजी बेपत्ता असणार्या तरूणाचा मृतदेह गिरणा नदी पात्रा ठिकाणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती अशी कि, शहरातील मेहरूण परिसरातील भूषण सुरेश शेट्टी ( वय ३३ ) हा तरूण विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. तो शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता. गिरणा नदीच्या जवळ असलेल्या महादेव मंदिराच्या खालील बाजूस या तरुणाचा आज मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान, मयत भूषण सुरेश शेट्टी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलिसात फिर्याद देण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यत सुरु होते.






















