जळगाव : प्रतिनिधी
शहर आम आदमी पार्टीने पार्टीचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवास्थानावर भाजपाच्या काही कार्यकर्त्यानी दि.30 रोजी हल्ला चढावला होता. याचा घटनेचा निषेध म्हणून जळगाव शहर आम आदमी पार्टीने जळगाव जिल्हाधिकारी राऊत याना निवेदन देऊन निषेध केला. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे दर्शन घेऊन शांतीपूर्व,संविधसन्निक मार्गातून कुठलीही घोषणाबाजी न करता मुक निषेध कारण्यात आले.या मुक निषेधा मागे विरोधींना निदर्शने कसे असावी हे निदर्शनात आणून देण्याचा जळगाव शहर आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यन्नि प्रयन्त केला सदर कार्यक्रमाचे नेतृत्व जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन जळगाव शहर महानगर सह सहयोजक अनिल वाघ सर यांनी केले, तसेच पुढील कार्यक्रमाची रूपरेषा जळगाव शहर महानगर सचिव चंदन पाटील. यांनी केले तसेच जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई मीडियाचे नियोजन यांनी केले यावेळी प्रसंगी उपस्थित जिल्हा सचिव रईस खान,जालना संघटक लक्ष्मण कोल्हे जाधव साहेब,सिद्धार्थ सोनावणे हेमंत सोनावणे. आदी करायकर्ते उपस्थित होते.




















