• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ नोव्हेंबर २०२६

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे शेतीच्या व्यवहारासाठी आलेल्या कन्नड येथील ५२ वर्षीय व्यावसायिकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डॉ. संजय मनोहर तेली (वय ५२, रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची शेतीच्या व्यवहारातून हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व पाचोरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन संशयितांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संजय तेली हे वैद्यकीय क्षेत्रासह जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. गोराडखेडा येथील राहुल धर्मराज पाटील यांच्या मालकीची दोन एकर जमीन एक कोटी दोन लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्याचे त्यांनी निश्चित केले होते. या व्यवहारापोटी त्यांनी राहुल पाटील यांना ८० लाख रुपये बयाणा दिला होता. दि.१७ नोव्हेंबर रोजी डॉ. तेली हे कन्नड येथून मुलीसह चारचाकी वाहनाने निघाले होते. मुलीला जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज येथे सोडल्यानंतर ते पिंपळगाव हरेश्वर येथे आपल्या शालकाकडून पाच लाख रुपये घेण्यासाठी गेले. त्यानंतर सांगवी प्र.लोद येथील घरी परतून तीन लाख दहा हजार रुपये घरी ठेवले व उर्वरित एक लाख ९० हजार रुपये घेऊन दि. १८ नोव्हेंबर रोजी गोराडखेडा येथे राहुल पाटील यांच्याकडे गेले. शेतीच्या व्यवहारातून घडलेल्या या हत्याकांडामुळे गोराडखेडा परिसरासह पाचोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जमीन व्यवहारावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याच वादातून राहुल पाटील याने डॉ. तेली यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर राहुल पाटील याने आपल्या सालदाराच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून जवळच असलेल्या बहुळा धरणात फेकल्याची कबुली दिल्याचे समजते. डॉ. संजय तेली हे १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाइकांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा शोध लागण्यासाठी एक लाख २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांकडून सुरू होता. अखेर तपासाअंती राहुल धर्मराज पाटील व त्याच्या सालदाराने संगनमताने खून केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

संशयितांनी दिलेल्या माहितीनंतर दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेपासून बहुळा धरणात डॉ. संजय तेली यांचा मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने पोलिसांना बंदोबस्त राखण्यासाठी कसरत करावी लागली. यावेळी आरसीपी प्लाटूनसह पाचोरा पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Related Posts

दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!
क्राईम

दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

November 23, 2026
पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार
जळगाव

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026
खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

November 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आमिष अन् पाच वर्षे अत्याचार : जळगावात धक्कादायक घटना !

November 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

November 23, 2026
दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

November 23, 2026
पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group