जळगाव मिरर | २३ नोव्हेंबर २०२६
एकीकीडे कर्जफेडीची चिंता असताना दुष्काळजन्य स्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने चिंतेत असलेल्या गजानन पद्माकर पाटील (वय ४८, रा. विदगाव, ता. जळगाव) यांनी आत्महत्या केली. राहत्या घरातच त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना दि. २१ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विदगाव येथे राहणारे गजानन पाटील हे दिव्यांग होते. दिव्यांग असतानाही गजानन पाटील हे जिद्दीने शेती करायचे. शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. कर्ज फेडीची चिंता असताना यंदा दुष्काळी स्थिती निर्माण होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. रात्रीच्या वेळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





















