एरंडोल : प्रतिनिधी
वाढत्या महागाई विरोधात एरंडोल शहर युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारचे अभिनंदन करत अनोखे थाळी व टाळी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी युवासैनिकांकडून दरवाढीच्या निषेधार्थ फलक व गॅस सिलिंडरला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन यांनी केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी सभापती शालिग्राम गायकवाड, मा.नगरसेवक नितिन बिर्ला, माजी नगरसेवक सुनील चौधरी, शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, चिंतामण पाटील, राजेंद्र ठाकूर, विठ्ठल आंधळे, जावेद मुजावर, युवासेना तालुकाप्रमुख बबलू पाटील, सुनील मराठे, चंदू जोहरी, नासिर शेख, युवराज महाजन, पिंटू मिस्त्री आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवासेना शहर समनव्यक अमोल भावसार, कुणाल पाटील, मोहन महाजन, गोविंदा बिर्ला, कृष्णा ओतरी, अजय महाजन, चेतन बडगुजर, अतुल मराठे, प्रसाद महाजन, राज पाटील, बबलू मराठे आदींनी परिश्रम घेतले.




















