
जळगाव मिरर / ११ फेब्रुवारी २०२३ ।
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी ७ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आता त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितित भाजप मध्ये प्रवेश केलाय. देवेंद्र फडणवीसांनी यांनी सर्वांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचं पक्षात स्वागत केलं.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शनिवार ११ फेब्रुवारी २०२३ ला पक्षीय कार्यकारणी बैठक झाली. यावेळी अनेक नवीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रिया बेर्डे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप मधला प्रवेश स्वीकारला. दरम्यान प्रिया बेर्डेंनी ७ जुलै २०२२ ला राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रावादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र म्हणत प्रिया बेर्डे यांनी भाजप मध्ये प्रवेश केलाय.
प्रिया बेर्डे या मराठीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. गेली अनेक वर्ष प्रिया बेर्डे मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रिया बेर्डे या पत्नी आहेत. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांची मुलं स्वानंदी आणि अभिनय हे दोघे सुद्दा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रिया बेर्डे सध्या लेक स्वानंदी सोबत धनंजय माने इथेच राहतात या नाटकात अभिनय करत आहेत काही महिन्यांपूर्वी प्रिया बेर्डे यांना १० लाख रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पुण्यात २०१२ साली अखिल भारतीय चित्रपट मंडळाकडून ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ५२ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या खर्चावर कोल्हापूर येथील काही सभासदांनी आक्षेप घेतला होता. पुढे धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे प्रिया बेर्डे सह अलका कुबल, विजय पाटकर याना १० लाख रुपये एका आठवड्यात भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.






















